गरिबीमुळे आई मोबाईल देऊ शकली नाही; यामुळे नाराज होऊन मुलाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आजकाल लहान मुले आपल्या आई-वडिलांकडे एक ना अनेक कारणांसाठी हट्ट करत असतात आणि या हट्टापायी ही मुले टोकाचे पाऊल (Suicide) देखील उचलत असतात. अशाच पद्धतीची एक बातमी सध्या बारामती तालुक्यातून समोर आली आहे. आईने मोबाईल दिला नाही या कारणावरून नाराज झालेल्या एका शाळकरी मुलाने चक्क गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे.

ही घटना बारामती तालुक्यातील क-हावागज या गावात घडली आहे. आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव शुभ मोतीराम धोत्रे असे आहे. शुभम अंजनगाव येथील सोमेश्वर महाविद्यालयात इयत्ता नववी मध्ये शिकत होता. शुभमला वडील नसल्याने आई एकटीच त्याचा सांभाळ करीत होती. घरची परिस्थिती नसल्याने आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होती. मात्र शुभम आईकडे मोबाईल साठी हट्ट करत होता. आर्थिक परिस्थितीमुळे आईने मोबाईल घेऊन दिला नाही या कारणामुळे निराश झालेल्या शुभमने गळफास (Suicide) घेऊन आत्महत्या केली. शुभमने पत्र्याच्या शेडच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास (Suicide) घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला.

या घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण अवसर यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण घटनेची माहिती घेतली. यापुढील अधिक तपास मालेगाव पोलीस करत आहेत. मोबाईल न दिल्याने केवळ या कारणामुळे शुभमने गळफास (Suicide) घेतल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.गुरुवार संध्याकाळी साडेपाच ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान हि घटना घडली.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!