Wednesday, June 7, 2023

क्रूरतेचा कळस! तब्बल 114 वेळा वार करत 13 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीने 13 वर्षाच्या चिमुकलीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. त्याने या चिमुकलीवर धारदार शस्त्राने 114 वेळा वार केले आहेत. एवढेच नाहीतर त्याने मुलीच्या पायावर कर्मा असे लिहिले आहे.

तपासामध्ये असे समोर आले कि, आरोपीनं या हत्येआधी काही दिवसांपूर्वी आपल्या मित्रांजवळ म्हटलं होतं, की त्याला चाकूने कोणालातरी मारायचे आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या घटनेतील आरोपी अल्पवयीन आहे, त्याचे वय 14 वर्ष आहे. या आरोपीने हत्या केल्यानंतर कोणीतरी मृत ट्रिस्टिन बॅली हिच्या पायावर निळ्या रंगाच्या शाईने कर्मा असे लिहिले. तर, दुसऱ्या पायावर स्मायली काढली आहे. हे कोणी लिहिले याचा तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी फ्लोरिडामधील एका तलावाजवळ झाडाच्या खालून पीडितेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. आरोपीने आपल्या मित्रांना सांगितले की एक दिवस तो कोणालातरी याच झाडाखाली आणून मारणार आहे. तो एकटाच हातात चाकू घेऊन कोणालातरी मारण्याचा सराव करत असायचा. मृत चिमुकली हि चिअरलीडर होती. पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून सध्या आरोपी आणि त्याच्या ओळखीच्या लोकांची चौकशी सुरु आहे. आरोपीने पीडितेला कोणत्या कारणामुळे मारलं याचा शोध पोलीस घेत आहेत.