धक्कादायक ! 10 वर्षीय मुलीवर 6 अल्पवयीन मुलांकडून बलात्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रेवाडी : वृत्तसंस्था – हरियाणामधील रेवाडी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका 10 वर्षीय मुलीवर तिच्या शाळेतील परिसरात 6 जणांकडून बलात्कार करण्यात आला आहे. यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यातील 6 मुले ही अल्पवयीन आहेत. हा सर्व प्रकार 24 मे रोजी घडला. या घटनेचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या अल्पवयीन मुलांनी या घटनेचा व्हिडीओ बनवून तो काहींच्या व्हाट्सअपवर पाठवला. यानंतर हि घटना उघडकीस आली.

हि दुर्दैवी घटना हरियाणामधील रेवाडीच्या रामपुरा पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी तिसरीच्या वर्गात शिकत आहे. 24 मे रोजी हि पीडित मुलगी घराजवळच असलेल्या शाळेच्या मैदानात खेळत होती. यादरम्यान आजूबाजूला असलेल्या मुलांनी तिला पकडून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे कृत्य करणारी मुले ही 8 ते 14 वर्षे वयोगटातील असून यातील एकजणच अठरा वर्षांचा आहे. एवढ्या कमी वयाच्या मुलांनी बलात्काराचा गुन्हा केल्याने सर्वाना धक्का बसला आहे. तसेच या मुलांनी या घटनेचा व्हिडीओ देखील शूट केला होता.

हा व्हिडिओ व्हाट्सअपवर मोठ्या प्रमाणात वायरल झाला. हा व्हिडिओ जेव्हा पीडित मुलीच्या वडिलांना दिसला तेव्हा त्यांना जबर हादरा बसला यानंतर त्यांनी पोलिसांना तक्रार दाखल केली. या घटनेने गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींमधील दोघेजण हे पीडित मुलीच्या घरातीलच आहे तर बाकी आरोपी शेजारील परिसरातील आहे अशी माहिती रेवाडीचे डीएसपी हंसराज यांनी दिली आहे. हा व्हिडिओ नेमका कोणाच्या मोबाईलवर शूट झाला आणि तो कोणा-कोणाला पाठवला गेला आणि त्यांनी कोणाला शेअर केला आहे सध्या पोलिसांकडून याची चौकशी करण्यात येत आहे. या सर्व अल्पवयीन आरोपींची सध्या सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

Leave a Comment