चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी। देशभरात महिलांवर होणारे अत्याचार सातत्याने वाढत असताना, सांगली मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. मिरज पोलिसांनी या प्रकरणी बलात्कार करणाऱ्या रविंद्र शिवाजी तवटे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रविंद्र तवटे हा मंडप डेकोरेशनचे काम करतो. अल्पवयीन मुलगीच्या शाळेत मंडप टाकण्याचे काम करीत असताना त्याने अल्पवयीन मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यावर मुलीने त्यास जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तवटे याने जवळ असलेल्या धारदार चाकूने तिला धमकाविले. अल्पवयीन मुलगी घाबरली त्यावेळी तवटे याने या मुलीला जबरदस्तीने शाळेच्या पाठीमागील घरामध्ये नेवून जबरदस्तीने अत्याचार केला.

तिला चाकुचा धाक दाखवून तु काय बोललीस तर घरातील लोकांना मारून टाकीन अशी धमकी दिली. मुलगी घाबरलेल्या स्थितीत घरी गेल्यानंतर नातेवाईकांनी विचारणा केली असता त्या मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. मिरज ग्रामीण पोलिसात रविंद्र तवटे याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून तवटे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयापुढे आज उभे केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

Leave a Comment