Sunday, June 4, 2023

दोस्तीत कुस्ती ! तरुणीच्या मित्रांनी दिलेल्या साथीमुळे नराधमांनी तरुणीसोबत केले ‘हे’ कृत्य

इस्लामपूर : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर याठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. यासंदर्भात पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत नराधम आरोपीला तिच्याच अल्पवयीन मित्र मैत्रिणींनी साथ दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह अन्य चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीच्या दोन साथीदारांना अटक केली आहे तर मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास इस्लामपूर पोलीस करत आहेत.

मुस्तफा हुसेन पठाण, खालीद मुसा मुल्ला अशी अटक करण्‍यात आलेल्‍या संशयित आरोपींची नावे आहेत. तर रोहन कुरणे हा मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. तीन महिन्यांपूर्वी पीडित मुलगी आपल्या घरी जात असताना मुस्तफा याने तिचा रस्ता अडवला होता. यानंतर याठिकाणी आलेल्या रोहन कुरणे यानं पीडित मुलीला आणि तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत, तिला एका घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. पीडित मुलीने घाबरून या घटनेची कुठेच वाच्यता केली नाही. पण नऊ दिवसांपूर्वी आरोपीनं पीडित मुलीवर अशाच प्रकारे दुसऱ्यांदा बलात्कार केला.

या आरोपीने पीडितेच्या अल्पवयीन मैत्रिणीला आणि तिला दुचाकीवर घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला होता. यानंतर आरोपी कुरणे आणि मुस्तफा याने पीडित मुलीला धमकी देऊन तिच्या घरी सोडले होते. हे प्रकरण जेव्हा पीडित मुलीच्या वडिलांना समजले तेव्हा आरोपींनी त्यांनासुद्धा धमकी दिली होती. यानंतर आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने अखेर इस्लामपूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणात पीडितेची अल्पवयीन मैत्रीण आणि एका अल्पवयीन तरुणाने आरोपींची मदत केली होती. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.