Tuesday, June 6, 2023

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार; 6 महिन्यांनी नराधमाला झाली अटक

बिलासपूर : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये घरात कोणी नसल्याचा फायदा घेत एका तरुणानं अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून तिच्यावर बलात्कार केला आहे. बलात्कार केल्यानंतर मुलीला मारहाण करण्यात आली आहे. तसेच आरोपीने याबाबत कोणाला काही सांगितल्यास कुटुंबातील सर्वांना ठार मारण्याची धमकीसुद्धा दिली. अखेर सहा महिन्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे.

या आरोपीने कुटुंबातील लोकांना ठार मारण्याची धमकी दिल्यानं मुलीनं याबाबत कोणास काही सांगितले नव्हते. त्यामुळं या आरोपी नराधमानं सहा महिन्याचा काळात धमकी देत मुलीवर तीन वेळा बलात्कार केला. या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून बिलासपूर महिला पोलीस ठाण्यात आरोपी नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने आपल्या तक्रारीत सांगितले कि, तिचे आई-वडील काही महिन्यांपूर्वी घरी नसताना आरोपी तरुण घरात आला आणि तिला धमकी देऊन बळजबरी केली.

या दरम्यान त्याने तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवले आणि तिला याबाबत कोणालाही सांगायचे नाही असे धमकावले. तसेच या घटनेबद्दल कोणाला सांगितल्यास भाऊ, वडील आणि बहिणीला ठार मारण्याची धमकीसुद्धा दिली. तक्रारीमध्ये अल्पवयीन मुलीने आरोप केला आहे की, घटनेनंतरही तीन वेळा आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला होता. पोलिसांनी आरोपीविरुद्ध IPC कलम 376 आणि POCSO कायदा आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.