नात्याला काळीमा फासणारी घटना! जन्मदात्या बापाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Rape case
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये मुलींच्या सुरक्षेतेसंदर्भात दिवसेंदिवेश प्रश्न वाढत चालले आहेत. कारण, दररोज कोणत्या ना कोणत्या भागातून मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. आता अशीच एक धक्कादायक घटना दहिवडी भागातून समोर आली आहे. याठिकाणी एका नराधम बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. पिडीत मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे या घटनेने सर्वांना सुन्न केले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, माण तालुक्यात ही संतापजनक घटना घडली आहे. नराधम वडील गेल्या दोन वर्षांपासून मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. मात्र एकेदिवशी आईला याबाबत संशय वाटल्यानंतर तिने मुलीची विचारपूस केली. त्यावेळी वडिलांनीच आपल्यावर अत्याचार केल्याची माहिती पिडीत मुलीने आईला दिली. हे ऐकून मुलीच्या आईला धक्का बसला. त्यांनी तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून दहिवडी पोलिसांनी मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला ताब्यात घेतले आहे. सध्या मुलगी गरोदर असल्यामुळे तिच्यावर रुग्णालयात योग्य उपचार सुरू आहेत. मात्र या संपूर्ण घटनेमुळे तिच्या मनात भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी पिडीत मुलीचा देखील जबाब नोंदवून घेतला आहे. मुलीने दिलेल्या जबाबाच्या आधारावर पोलीस पुढील कारवाई करतील.