Commomwelath Games 2022 : मीराबाई चानूने गोल्ड मेडल जिंकत केला ‘हा’ नवा विक्रम

Mirabai chanu
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची स्टार वेटफिल्टर मीराबाई चानू हिने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commomwelath Games 2022) 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commomwelath Games 2022) भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. मीराबाईने या राष्ट्रकुल स्पर्धेत (Commomwelath Games 2022) सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे. तिने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. या कामगिरीबरोबर मीराबाई चानूने नवा विक्रम रचला आहे. मीराबाई चानूने स्नॅचमध्ये 88 किलो वजन उचलले असून क्लीन अँड जर्कमध्ये मीराबाईने 113 किलो वजन उचलण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला. म्हणजेच या स्पर्धेत मीराबाईने एकूण 201 किलो वजन उचलले असून हा कॉमनवेल्थ गेम्समधील (Commomwelath Games 2022) नवा विक्रम आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक
मीराबाई चानूने महिलांच्या वेटलिफ्टिंगमध्ये पदक मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. या ट्विटमध्ये मीराबाई चानूने पुन्हा एकदा भारताचा गौरव केला असल्याचे म्हटले आहे. बर्मिंगहॅम गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून नवा राष्ट्रकुल विक्रम (Commomwelath Games 2022)  प्रस्थापित केल्याचा प्रत्येक भारतीयाला आनंद आहे. त्यांचे यश अनेक भारतीयांना, विशेषत: नवीन खेळाडूंना प्रेरणा देत राहील असे म्हंटले आहे.

2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने तिसरे पदक जिंकले
राष्ट्रकुल स्पर्धेत (Commomwelath Games 2022) भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली असून तिन्ही पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत. 30 जुलै (शनिवार) रोजी संकेत महादेव सरगरने पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. त्यानंतर गुरुराजा पुजारीने 61 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. कॉमनवेल्थ गेम्सच्या (Commomwelath Games 2022)  इतिहासातील वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे 128 वे पदक आहे. भारतापेक्षा फक्त ऑस्ट्रेलियाने जास्त पदके जिंकली आहेत.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर