‘टोनी एन सिंग’ ठरली ‘मिस वर्ल्ड’ 2019 ची विश्वसुंदरी…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंदेरी दुनिया । मिस यूनिव्हर्स 2019 नंतर शनिवारी रात्री उशिरा मिस वर्ल्ड 2019 ची घोषणा करण्यात आली. जमैकाच्या टोनी एन सिंगने 2019 चा बहुप्रतिष्ठित मिस वर्ल्डचा किताब पटकावला आहे. ती 69 वी विश्वसुंदरी ठरली आहे.

दरम्यान, लंडनमध्ये झालेल्या सोहळ्यात जमैकाच्या टोनी एन सिंग हीने मिस वर्ल्ड 2019 चा मुकुट पटकावला.यामध्ये फ्रान्सची ओफिली मेजिनो उपविजेती ठरली तर भारताची सुमन राव तिसऱ्या स्थानावार राहिली.

टोनी एन सिंगने मिस वर्ल्डचा मुकुट 120 देशांमधील स्पर्धकांना मागे टाकून जिंकला आहे. तिसऱ्या स्थानावर राहिलेली सुमन राव राजस्थानची असून 2019 चा मिस इंडियाचा किताब तिने जिंकलं होता.

 
 

 

 
 
 

 

Leave a Comment