एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेतर्फे बी. ए. आणि एम. ए. अॅडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रमाला सुरुवात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर येथील “एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस विद्याशाखेतर्फे बी. ए. एडमिनिस्ट्रेशन आणि एम.ए. एडमिनिस्ट्रेशन या दोन अभ्यासक्रमाची सुरुवात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात आली आहे. या विद्याशाखेतर्फे बारावीनंतर चार वर्षाचा बी. ए. हा पदवी अभ्यासक्रम आणि पदवीनंतर तीन वर्षाचा एम. ए. हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्याची माहिती एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस विद्याशाखेचे संचालक सुजित धर्मपात्रे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

सुजित धर्मपात्रे म्हणाले, एमआयटी आर्ट डिझाइन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्यातर्फे स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकिय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारावी नंतर बी.ए. एडमिनिस्ट्रेशन ही पदवी आणि पदवीनंतर एम. ए. एडमिनिस्ट्रेशन हा पदव्युत्तर अभ्यासक्रम देणारी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस” ही विद्याशाखा विद्यापीठात सुरू केली आहे. बारावीनंतर विद्यार्थ्यांची बी.ए./एम.ए. या अनुक्रमे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमादरम्यानच यूपीएससी (UPSC) व राज्य पीएससी (MPSC) यांची तयारी करून घेतली जाणार आहे. बी. ए. हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असून चौथे वर्ष हे इंटर्नशीपचे वर्ष आहे. तर एम.ए. हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून तिसरे वर्ष हे इंटर्नशीपचे वर्ष आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा पदवीनंतरचा स्पर्धा परीक्षांच्या तयारी करण्यासाठी लागणारा वेळवाचेल. याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास व चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठीचे कार्य केले जाणार आहे.

हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण निवासी असून मर्यादित विद्यार्थीसंख्या ठेवून गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणावर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक विकासासाठी “एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस सदैव प्रयत्न करणार आहे. यासोबतच पदवीनंतर विद्यापीठांमध्ये एमबीए, लॉ, जर्नलिझम, डिझाइन इत्यादी असे पदव्युत्तर अभ्यासक्रमही शिकता येणार आहे. या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमुळे दुर्दैवाने जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये पास होणार नाहीत, त्यांना प्रायव्हेट कंपनीमध्येही नोकरीची संधी प्राप्त होईल.

प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, देशाच्या उभारणीसाठी युवकांना तांत्रिक ज्ञानासोबतच मुल्याधिष्ठीत शिक्षण देण्यासाठी आम्ही कठीबद्ध आहोत. एमआयटी एडीटी विद्यापीठात मोठ्या प्रमाणात कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात येते. या वर्षापासून “एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस” या विद्याशाखेच्या माध्यमातून लोकसेवा सर्व्हिसेस करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना घडविण्याचा आमचा मानस आहे. या विद्याशाखेत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची आम्ही सुरुवात करीत आहोत. देशातील आणि राज्यातील विद्यार्थ्यांना रोजगारासाठी याचा लाभ होणार आहे.

Leave a Comment