Monday, February 6, 2023

मिचेल मॅकलेनघनचं मुंबई इंडिअन्सवरील प्रेम कायम; संघावर टीका करणाऱ्याला सुनावलं खडेबोल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | न्युझीलंडचा जलदगती गोलंदाज आणि गेल्या काही वर्षांपासून आयपीएल मध्ये मुंबई इंडिअन्सचे प्रतिनिधित्व करणारा मिचेल मॅकलेनघनला यंदा मुंबई इंडियन्सने लिलावात विकत घेतले नाही. परंतु मिचेल च मुंबई इंडिअन्स वरील प्रेम थोडंही कमी झालं नाही. मुंबई इंडियन्सच्या प्रदर्शनावरून एका युजरने मीचेलला छेडले असता त्याने त्या युजरला चांगलेच खडेबोल सुनावलं.

मिचेल मॅकलेनघन त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत होता, तेव्हा एका यूजरने मुंबई यंदा पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर राहिल, असं भाकीत वर्तवलं. त्यावर तू मुका आहेस का? असा सवाल मॅकलॅनघनने विचारला. तसंच मुंबई इंडियन्स जर शेवटच्या क्रमांकावर राहिली, तर टीमकडून मिळालेल्या सगळ्या वस्तूंचा आपण समाजकार्यासाठी लिलाव करू, असंही मॅकलेनघन म्हणाला.

- Advertisement -

 

2015 पासून मिचेलने आयपीएलमध्ये करियर सुरू केलं, पहिल्यापासून तो मुंबईच्याच टीममध्ये होता. या 6 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्याने 56 सामन्यांमध्ये 8.49 च्या सरासरीने 71 विकेट घेतल्या.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.