दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |भारताची दिग्गज महिला खेळाडू आणि एकदिवसीय कर्णधार मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मितालीने भारतासाठी 23 वर्षे क्रिकेट खेळले. तसेच महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे.

मिताली राजने ट्विट करून लिहिले की, ‘मी एक लहान मुलगी होते जेव्हा मी निळ्या रंगाची जर्सी घालून माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते. हा प्रवास सर्व प्रकारचे क्षण पाहण्यासाठी पुरेसा होता, गेली 23 वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक होती. इतर प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही संपत आहे आणि आज मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे.

दरम्यान, मिताली राज ही भारतीय महिला क्रिकेट मधील सर्वात दिग्गज खेळाडू म्हणून ओळखली जाते. मितालीने भारतासाठी 12 कसोटी सामन्यांमध्ये 43.68 च्या सरासरीने 699 धावा केल्या. तसेच तिने आत्तापर्यंत 232 एकदिवसीय सामने खेळले, असून त्यात तिने तब्बल 7805 धावा केल्या आहेत . मिताली राजच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये 64 अर्धशतके आणि 7 शतके आहेत, मिताली राजने 89 टी-20 सामनेही खेळले ज्यात तिने 37.52 च्या सरासरीने 2364 धावा केल्या

Leave a Comment