लढवय्ये बच्चूभाऊ बनले मंत्री, प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला पेढे वाटून आनंद साजरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे सलग चार वेळा आमदार म्हणुन निवडून आलेले प्रहारचे आमदार, दिव्यांगाचे मसिहा ओळख असलेले आणि शेतकरी प्रश्नावर वेळोवेळी आंदोलन करणारे दबंग आमदार बच्चू कडू यांनी आज राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी आशिष गवई येथे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्याची आतिषबाजी करीत पेढे वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी मोठ्या प्रमाणात प्रहारचे कार्यकर्ते ऊपस्थित होते.

शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेला सरकार स्थापन करताना पाठिंबा दिला होता. त्यानंतर गेल्या महिन्याभरापासून मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल का? याबाबत मतदारसंघात उत्सुकता होती. शेतकरी प्रश्नावर सभागृहात आक्रमक भूमिका मांडणारे आमदार म्हणून बच्चू कडू नेहमीच त्यांच्या आंदोलनांमुळं संपूर्ण राज्यात ओळखले जातात. तेव्हा आज राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर आमदार कडू यांना कृषीसंबंधित खातं मिळावं अशी इच्छा कार्यकर्त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

Leave a Comment