MLA P. N. Patil Death : काँग्रेस नेते, करवीरचे आमदार पी एन पाटील यांचे निधन

MLA P. N. Patil Death
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे कोल्हापुरातील आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी.एन. पाटील यांचे आज गुरुवारी (23 मे 2024) निधन (MLA P. N. Patil Death) झाले आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पी एन पाटील हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ होते तसेच माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक अशीही त्यांची ओळख होती. पी एन पाटील यांच्या निधनाने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली असून कोल्हापूर काँग्रेसने निष्ठावान नेता गमवला आहे .

डोक्याला झाली होती दुखापत – MLA P. N. Patil Death

रविवारी सकाळी चक्कर येऊन पडल्याने पी एन पाटील यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. यानंतर त्यांना तातडीने जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली, आज पहाटेच्या सुमारास त्यांनी आपला प्राण (MLA P. N. Patil Death) गमावला. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पी. एन. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी सडोेथेच च्यांली खालसा येथे नेण्यात येणार आहे. तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असे समजते.

पी एन पाटील यांच्या निधनानंतर कोल्हापूर काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केलं. काँग्रेसचे निष्ठावंत, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्याच्या निधनामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो व कुटुंबियांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो असं सतेज पाटील यांनी म्हंटल.

पी. एन. पाटील यांनी राजकारणाची सुरुवात केल्यापासून ते आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसचा झेंडा कधीच खाली ठेवला नाही. राजकीय जीवनात कितीही चढ उतार आले तरी त्यांनी कधीच पक्षाशी तडजोड केली नाही. ते नेहमीच काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले … कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद सलग १८ वर्ष आमदार पाटील यांच्याकडे होतं. काँग्रेसच्या पडत्या काळात त्यांनी पक्षाला उर्जित अवस्था दिली. स्वर्गीय विलासराव देशमुखांचे खंदे समर्थक म्हणूनही त्यांची ओळख होती. विलासरावांच्या कार्यकाळात जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होत होती तेव्हा तेव्हा पी. एन. पाटील यांच्या मंत्रिपदाची चर्चा रंगली. मात्र, मंत्रिपदाने त्यांना नेहमीच हुलकावणी दिली. हे सुद्धा तितकंच खरं आहे.