औरंगाबाद : शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल यांना सत्र न्यायालयाने ठोटावलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यामूर्ती आर. जी. अवचट यांनी रद्द करून 15 हजार रुपयाच्या जात मुचलक्यावर जमीन दिली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी कि, 20 मे 2018 मध्ये शहरात झालेल्या गोंधळात नंतर जैस्वाल यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. हे गुन्हे कलम 353 व 506 अन्वयी झाले होते. पोलीस ठाण्यात गोंधळ घालणे व सरकारी कामात अडथळा आणणे या मुळे त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते आणि सत्र न्यायालयाने जैस्वाल यांना दोषी ठरवले होते.
दरम्यान, अॅड. गोविंद कुलकर्णी यांनी खंडापीठात जैस्वाल यांची बाजू मांडली. खंडपीठाणे जैस्वाल यांना 15 हजार रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन दिली.