प्रणिती शिंदेंच्या मंत्रिपदासाठी युवक काँग्रेसचे धरणे आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । महाविकासआघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्याच्या पदरी निराशाच पडली आहे. सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेसच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळातून जाणीवपूर्वक जातीपातीच राजकारण करून डावलण्यात आलं असा आरोप प्रणिती शिंदे समर्थकांकडून केला जात आहे. सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले असूनही याची दखल प्रदेश पातळीवरून घेण्यात आली नाही.

त्यामुळं या घटनेचा क्लेश व्यक्त करण्यासाठी आज सर्व प्रणिती शिंदे समर्थक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोलापूर मधील काँग्रेस भवन येथे धरणे आंदोलन सुरु केले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसमधील मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या काही नेत्यांच्या समर्थकांमध्ये आता तीव्र नाराजी दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत पुण्यातील काँग्रेस भवनाची तोडफोड करत आपला राग व्यक्त केला होता. दरम्यान सदर तोडफोड करणारे माझे समर्थक नसल्याचे आमदार थोपटे यांनी स्पष्ट केलं. परंतु, मंत्रिपद न मिळाल्याची बोच त्यांना लागली असल्याचे लपून राहिलं आहे. अशाचप्रकारे आमदार परिणीती शिंदे यांचे समर्थक सुद्धा आपली नाराजी धरणे आंदोलनातून व्यक्त करत आहेत. आता काँग्रेसला राज्यातील स्थानिक राजकारणात समर्थक गटांच्या अशाप्रकारच्या आंदोलनाचा फटका बसेल का असा सवाल उपस्थित झाला आहे.

Leave a Comment