भाजप अन राज्यपालांचे ठरलंय! राज्यपाल नियुक्त जागांसाठी सरकारची यादी नाकारली जाणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर । विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांसाठी सरकारकडून येणारी नावं बाजूला ठेवली जाणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. “माझं आणि देवेंद्रजींचं बोलणं झालेलं आहे. राज्यपालांशी त्यांची चर्चा झालेली आहे. ही आलेली यादी बाजूला काढून ठेवण्याचं ठरलेलं असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं”, असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याचे माजी मंत्री विनय कोरे यांच्या मातोश्री यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यांचं सांत्वन करण्यासाठी भय्यासाहेब माने, जिल्हा बँकेचे युवराज पाटील गेले होते. सांत्वन केल्याच्या काही मिनिटांतच चंद्रकांत पाटलांचं आगमन झालं. विनय कोरे आणि चंद्रकांत पाटलांची सांत्वनापर चर्चा झाल्यानंतर त्या दिवशी विधान परिषदेची यादी राज्यपालांकडे जाणार आहे, अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीवर चर्चा झाल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, माझं आणि देवेंद्रजींचं बोलणं झालेलं आहे. राज्यपालांशी त्यांची चर्चा झालेली आहे. ही आलेली यादी बाजूला काढून ठेवण्याचं ठरलेलं आहे, असं वक्तव्य ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. (Hassan Mushrif On Governor Appointed MLA)

राज्यपाल नियुक्त आमदार निवडीवर चर्चा सुरू झाली तेव्हा चंद्रकांतदादा म्हणाले, माझं आणि देवेंद्र फडणवीस यांचं बोलणं झालं आहे. त्यांचं आणि राज्यपालांचे बोलणं झालंय. सरकारकडून येणारी नावं बाजूला ठेवली जाणार आहेत. राज्यपालांना त्यांचे अधिकार आहेत, असं वक्तव्य करून दादांनी राज्यपाल आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. तांत्रिक अडथळे आणून निवडीबद्दल चर्चा झाल्यास न्यायालयात जाण्याबाबत निर्णय घेऊ, असंही मुश्रीफांनी स्पष्ट केले आहे. हे सगळं असंवैधानिक आहे. राज्यपालांवर आतापर्यंत अनेक आरोप झाले आहे, असंही ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले. 

कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment