मनसेचा वर्धापनदिन प्रथमच मुंबईबाहेर; ‘या’ शहरात पार पडणार सोहळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे अर्थातच मनसेचा 16 वा वर्धापनदिन मुंबईत नसून पुण्यात साजरा केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 9 मार्च रोजी मनसेचा वर्धापनदिन साजरा केला जातो. यंदा पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्रात मनसेचा वर्धापन दिन सोहळा होईल. या सोहळ्याला मनसेचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती आहे.

मनसेचा वर्धापनदिन पहिल्यांदाच मुंबई बाहेर होणार आहे. राज्यभरातील मनसे पदाधिकारी वर्धापनदिनासाठी मोठ्या संख्येने पुण्यात येणार असल्याची माहिती आहे.काही दिवसांत पुणे महापालिकेच्या निवडणुका (PMC Elections 2022) होणार आहेत, त्याच पार्श्वभूमीवर मनसे आता या वर्धापन दिनानिमित्त मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे.

दरम्यान, आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसे कंबर कसली असून पक्षप्रमुख राज ठाकरे हे आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यापूर्वी नाशिका महापालिकेतील सत्ता मिळाली होती.

Leave a Comment