व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सांगली जिल्हा बँकेत 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा मनसेचा आरोप

सांगली । शेतकर्‍यांची अर्थवाहिनी असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तत्कालिन संचालक व अधिकार्‍यांनी संगनमताने 500 कोटींचा गैरव्यवहार केला आहे. काही कारखाने, संस्थांना विनातारण कर्जे वाटप केली आहेत. यामध्ये आरबीआय व नाबार्डच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. याबाबत लेखापरिक्षकांनी लेखापरिक्षण अहवालामध्ये याबाबत गंभीर आरोप नोंदविला आहे.

या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी दोषी संचालकांवर फौजदारी करावी, अशी नाबाई, रिझर्व्ह बँक, ईडीसह सहकार आयुक्त, जिल्हा उपनिबंधकांच्याकडे केली असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांनी केला आहे. दरम्यान, दोषी संचालकांवर कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले, जिल्हा बँक सर्वसामान्य शेतकर्‍यांचा कणा आहे ही बँक मोडून खाण्याचा प्रयत्न काही संचालकांनी सुरु केला आहे. बँकेच्या सन 2018-19 व सन 2019-20 च्या लेखापरिक्षणामध्ये अनेक गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

स्वप्नपूर्ती या कागदावरच असणार्‍या कारखान्यास एकाच दिवसात 23 कोटींचे कर्ज मंजूर केले आहे. यासाठी चार महिन्यांनी तारण देण्यात आले आहे. महांकाली, माणगंगा साखर कारखाने विकत घेतल्याचे दाखविले आहे. खरेदी दस्त नाहीत. काही साखर कारखान्यांना विनातारण कर्जे दिली आहेत. गोडाऊनमध्ये साखर नसताना ती असल्याचे भासवून कर्ज मंजूर केली आहेत. यापैकी बहुताशी संस्था या आजी माजी संचालक, त्यांचे नातेवाईकांच्या आहेत, असा आरोप करत सावंत यांनी केला.