हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॉलीवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे कधीच सहन केले जाणार नाही, असं म्हणत बदनाम करणाऱ्यांना इशारा दिला. त्यांच्या या इशाऱ्यानंतर मनसेनंही मुख्यमंत्र्यांच्या सुरात सूर मिसळून फिल्मसिटीचं मुंबई बाहेर हलवण्याचा कुटील डाव असल्याची टीका केली आहे.
भुतकाळातही बॉलीवूडमधील कलाकारांना गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली, त्यांना शिक्षा झाल्या, पण म्हणून कुणीही पूर्ण बॉलीवूडलाच खलनायक ठरवलं नाही. मात्र, जाणीवपूर्वक बॉलीवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जातोय. एवढंच नाही तर फिल्मसिटीचं मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जात आहे’ असा गंभीर आरोपही खोपकर यांनी केला.
भूतकाळातही बाॅलीवूडमधील कलाकारांना गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली, त्यांना शिक्षा झाल्या, पण म्हणून कुणीही पूर्ण बाॅलीवूडलाच खलनायक ठरवलं नाही. आता मात्र जाणीवपूर्वक बाॅलीवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जातोय, एवढंच नाही तर फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जातंय.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 16, 2020
‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही असली कारस्थानं कधीही यशस्वी होऊ देणार नाही. तंत्रज्ञांपासून कलाकारांपर्यंत कुणीही घाबरायची गरज नाही, कारण राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि यापुढेही राहणार, हा आमचा शब्द आहे’ असंही खोपकर म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’