मन की बात आहे पण मनातलं नाही…सगळंच राम भरोसे; मनसेचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात करोनाची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्याही वाढतच आहे अशातच काहींना ऑक्सिजन बेड मिळत नाही तर काहींना औषधे मिळत नाहीत अशी स्थिती आहे. तर सध्या देशात लसीकरणाचा तुटवडा जाणवतोय. देशाच्या याच परिस्थितीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांच्या वरही हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करीत देशाच्या आणि राज्याच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे की, “लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही” अशा आशयाचे ट्विट करत देशपांडे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
राज्यातील रुग्णवढीचा दर घसरला

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्माण झालेल्या संकटामध्ये एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्रात नव्या रुग्णांमध्ये घट होत आहे. राज्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, जळगाव सह १२ जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांचा आकडा घटनांना दिसत आहे. महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्येही केरोना रुग्णांचा आलेख सपाट होत असून या राज्यांमध्ये लवकरच नव्या रुग्णांचा आलेख घटतांना दिसू शकेल, अशी आशा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने सह सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यांनी गेल्या पाच आठवड्यांचा आलेख सादर केला. ते म्हणाले, महाराष्ट्रात १२ जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांची संख्या घटतांना दिसत आहे. आलेखानुसार मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, औरंगाबाद, जळगाव, नांदेड, लातूर, नंदूरबार, वाशिम, भंडारा, धुळे आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांची नोंद कमी झाल्याचे दिसत आहे.

Leave a Comment