‘गर्व से कहो हम हिंदू है’; शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी करत मनसेने डिवचले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे यांच्यातील आरोप – प्रत्यारोप सुरूच असताना आता मनसेने शिवसेना भवनासमोर दसऱ्याच्या शुभेच्छा देताना गर्व से कहो हम हिंदू है अशी बॅनरबाजी करत शिवसेनेला डिवचले आहे. त्यामुळे आता शिवसेने कडून नेमकं काय प्रत्युत्तर येणार हे सुद्धा पाहिले पाहिजे.

सेनाभवना समोर हे पोस्टर लावून एकीकडे मनसे हिंदूत्वाचा नारा बुलंद करत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने हिंदूत्वापासून फारकत घेतली आहे असे दाखवण्याता प्रयत्न या पोस्टर मधून होत आहे. शिवसेनाचा आज दसरा मेळावा होत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापूर्वी मनसेने असे पोस्टर्स लावून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

आज शिवसेनेचा दसरा मेळावा-

दरम्यान, मुंबईत आज शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याची शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या दसरा मेळाव्याला हजारो शिवसैनिक उपस्थित राहू शकणार आहेत. बंदीस्त सभागृहातील उपस्थिती मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. षण्मुखानंद सभागृहाच्या पूर्ण क्षमतेने प्रवेशाची शक्यता आहे. षण्मुखानंद सभागृहाची आसन क्षमता 3 हजार आहे. त्यामुळे या मेळाव्यात शिवसेनेचा जोश दिसणार हेच दिसून येत आहे.

Leave a Comment