मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांची पदावरुन हकालपट्टी, तर शहराध्यक्ष गुलाटींना ‘प्रमोशन’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान मोठी कारवाई झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार औरंगाबाद मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. यामुळे दाशरथे यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरल्याची समजते. सुहास दाशरथे हे अगोदर शिवसेनेत होते. त्यांना महत्त्वाचे पद न मिळाल्याने त्यांनी मनसेत प्रवेश केला होता. येथेही त्यांची उपेक्षाच झाली.

मनसेतील गटबाजीमुळे काही दिवसांपासून औरंगाबादेत वाद पाहायला मिळत होता. आज मंगळवारी (ता.१४) राज ठाकरे शहरात मराठवाड्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. दरम्यान आगामी औरंगाबाद महानगरपालिका, नगरपंचायत निवडणुकींच्या तयारीच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. काल रात्री त्यांचे शहरात आगमन झाले. पदाधिकारी, कार्यकर्त्यांना त्यांचे स्वागत करता आले नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांची माफी मागितली.

औरंगाबाद मनसेची नवीन कार्यकारिणी –
राज्य उपाध्यक्ष – सतनामसिंग गुलाटी
जिल्हाध्यक्ष – सुमित खांबेकर (पूर्व-पश्चिम-मध्य)
दिलीप बनकर – गंगापूर, वैजापूर, पैठण
वैभव मिटकर – फुलंब्री, सिल्लोड,कन्नड
महानगर प्रमुख औरंगाबाद – बिपीन नाईक
शहर अध्यक्ष – आशिष सुरडकर, गजन गौडा पाटील

Leave a Comment