Sunday, May 28, 2023

लहान मुलांसाठीच्या कोरोना लसीबाबत अदर पूनावालांनी केली ‘ही’ मोठी घोषणा; म्हणाले कि..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरोनाबरोबर कोरोनाच्या नव्या व्हेरियंट असलेल्या ओमिक्रोनचा धोका वाढत आहे. याचा लहान मुलांना जास्त धोका असल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान आता लसीकरणाबाबत पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी मोठी घोषणा केली आहे. “लहान मुलांसाठी असलेली आमची कोवावॅक्स ही व्हॅक्सिन सध्या चाचणी स्तरावर आहे. ही लस येत्या सहा महिन्यांत लाँच केली जाईल. सिरम कडूनच १८ वयोगटापेक्षाही खालच्या आणि थेट तीन वर्षे वयाच्या मुलांना देखील देता येईल, अशी घोषणा पूनावाला यांनी केली आहे.

सीआयआय अर्थात कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री या संस्थेच्यावतीने आज चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी पूनावाला यांनी लहान मुलांसाठीच्या कोवावॅक्स या लसीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून भारतात आणि त्याहून अधिक काळापासून जगभरात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. देशभरात अनेक संस्था लहान मुलांना देता येईल, अशी कोरोना लस तयार करण्यासाठी संशोधन करत आहेत.

देशात सध्या दिल्या जाणाऱ्या कोरोना लसींमध्ये सर्वाधिक वाटा हा सिरम इन्स्टिट्युटकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या कोविशिल्ड लसीचा आहे. त्यामुळे सिरम कडूनच १८ वयोगटापेक्षाही खालच्या आणि थेट तीन वर्षे वयाच्या मुलांना देखील देता येईल.

आमची कोवावॅक्स ही व्हॅक्सिन सध्या चाचणी स्तरावर आहे. पण तिच्या चाचण्यांचे अतिशय उत्तम निष्कर्श दिसत आहेत. अगदी ३ वर्षे वयाच्या मुलांवर देखील या लसीची चाचणी करण्यात आली आहे. लवकरच हि लस आम्ही उपलब्ध करणार आहोत, असे पुनावाला यांनी सांगितले.