‘घट’ बसले तरी घरातच ‘घट्ट’ बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?; मनसेचा मुख्यमंत्री ठाकरेंना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने कोरोनापासून बंद ठेवलेली मंदिरे आजपासून खुली करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार आज नवरात्रोस्तवाच्या सुरुवातीलाच राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली. मंदिरे खुली झाल्यानांतर विविध मंत्री, नेत्यांनी फाटफाटे मंदिरात जाऊन पूजा, आरतीची केली. या पार्श्वभूमीवर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “उद्यापासून ‘घट’ बसतील पण गेलं दीड वर्ष घरातच ‘घट्ट’ बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?, असा सवाल ठाकरे यांनी विचारला आहे.

मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, उद्यापासून ‘घट’ बसतील पण गेलं दीड वर्ष घरातच ‘घट्ट’ बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील? असा सवाल केला आहे.

त्याचबरोबर ठाकरेंनी आज केलेल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे कि, नवरात्र उत्सवाला देशात आज सुरुवात होत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील जागृत देवींना दिवसाला रोज एक गाऱ्हाणे घालून महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी लाभो अशी प्रार्थना करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री आणि वर्षा या निवासस्थानातूनच आपले काम पाहिलेले होते. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी टीका केली आहे.

You might also like