लाचार संजय राऊत यांना “स्मृतीभ्रंश”झालाय; मनसे नेत्याची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अशात शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारबद्दल हे सरकार बाळासाहेबांच्या स्वप्नातील सरकार आआहे, असे विधान केले आहे. त्यांच्या विधानावर मनसे नेते गजानन कळले यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. “संजय राऊत म्हणतात आताचे सरकार हे बाळासाहेबांच्या स्वप्नातील सरकार आहे. मा. बाळासाहेब असते तर हे सरकार बनवायचा प्रस्ताव आणणाऱ्यांच्या पेकाटात लाथ घातली असती. लाचार राऊतांना “स्मृतीभ्रंश”झालाय, अशी टीका काळे यांनी केली आहे.

गजानन काळे यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “संजय राऊत म्हणतात आताचे सरकार हे बाळासाहेबांच्या स्वप्नातील सरकार आहे. मा. बाळासाहेब असते तर हे सरकार बनवायचा प्रस्ताव आणणाऱ्यांच्या पेकाटात लाथ घातली असती.हिंदु द्वेष करणाऱ्या काँग्रेस,राष्ट्रवादीबद्दल बाळासाहेबांनी अनेकदा आसूड ओढले आहेत. लाचार संजय राऊत यांना”स्मृतीभ्रंश”झालाय, अशी टीका काळे यांनी केली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची काल एका मुलाखत झाली. यावेळी संजय राऊत यांनी एका प्रश्नावर उत्तर दिले. ते म्हणाले की, “शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे अनेकदा व्यासपीठावर एकत्र दिसलेले आहेत. आता जे सरकार आलेले आहे, ते बाळासाहेबांचे स्वप्न होते, बाळासाहेबांची भूमिका होती. आज अनेकांकडून गैसरमज निर्माण केला जातोय, त्यांना शिवसेनेचा विचार आणि बाळासाहेबांची भूमिका माहिती नाही,” असे राऊत यांनी म्हंटले.

Leave a Comment