कोण घनश्याम पाटील ! त्याची लायकी आहे का राज ठाकरे साहेबांवर लिहीण्याची ; मनसे नेते किशोर शिंदे यांची संतप्त प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अरे कोण हा घनश्याम पाटील ! त्याची लायकी आहे का राज ठाकरे साहेबांवर लिहिण्याची. कुठलं तरी दीड दमडीच मासिक चालवतो.कोण वाचत त्याच्या मासिकाला आणि थेट राज ठाकरे साहेबांवर लिहिण्याची घाई करतो.आता त्याची आम्ही आमच्या स्टाईलने वरात काढणार अशा कडक शब्दात मनसे नेते किशोर शिंदे यांनी “हॅलो महाराष्ट्र” सोबत घनश्याम पाटील ब्लॉग प्रकरणावर बोलतांना प्रतिक्रिया दिली.

पुणेस्थित “चपराक” या मासिकाचे संपादक घनश्याम पाटील यांनी “मला जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट करायची आहे” या टायटल खाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाची चिकित्सा करणारा ब्लॉग लिहिला आहे.यावर राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह तर निर्माण केलेच आहे पण त्यांना “सेटलमेंट” किंग अशी उपाधी देखील लावण्याचा गल्लीच्छ प्रकार घनश्याम पाटील यांनी केला आहे.

तसेच हा नालायक राज साहेबांवर लिहितो आणि पळपुटा पळून देखील जातो.काल पासून आमचे मनसैनिक त्याला फोन करत आहेत. भामटा पळून गेला आहे फोन घेत नाही. स्वतःला पत्रकार म्हणवतो ना ! मग पळतो कशाला, असा सवाल देखील शिंदे यांनी विचारला आहे.

दरम्यान, घनशाम पाटील यांच्याशी आम्ही देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही.पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे खंदे समर्थक मानले जातात.त्यांच्या बातम्यांचा सुर देखील संघाच्या विचारांना पूरक असतो अशी महिती प्रथमदर्शनी आम्हाला मिळाली आहे.

You might also like