भाजपसोबत युती करा, पक्षाला फायदा होईल; मनसे नेत्यांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपशी युती करावी अशी मागणी मनसेच्या पुण्यातील नेत्यांनी राज ठाकरेकडे केली आहे. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल, असे सांगितले जात आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेकडून अंतर्गत चाचपणी मोहीम सुरु आहे. यावेळी मनसे नेत्यांच्या एका गटाने आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरला आहे

जर महापालिका निवडणुकीत आपण भाजपशी युती केली, तर मनसेला फायदा होईल, परिणामी हे दोन्ही पक्ष सत्तेत येण्याची शक्यता अधिक राहणार असल्याचे गणित पुण्यातील मनसेच्या नेत्यांकडून राज ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आले आहे.