सीएम साहेब, सर्वांच्या पाठीवर “शिव पंख” लावून द्या, कामावर जाता येईल; मनसेचा खोचक टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी आल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील 25 जिल्ह्यामध्ये निर्बंधात शिथिलता आणली आहे तर जिथे कोरोना रुग्णसंख्या कायम आहे त्या 11 जिल्ह्यांमध्ये मात्र निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मुंबई लोकलही अद्याप सुरू होणार नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितल्यानंतर मनसेने खोचक टोला लगावला आहे.

सीएम साहेब आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार. लोकल बंद आहेत, बसला प्रचंड वेळ लागतो. गर्दीही असते. आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण “शिव पंख” लावून दिलेत, तर त्यांना कामावरही जाता येईल आणि त्रास पण नाही. मला खात्री आहे आपण हे करु शकता, आमचा सीएम जगात भारी” असे खोचक ट्वीट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे.

मुंबई लोकल बाबत मुख्यमंत्री काय म्हणाले-

उद्धव ठाकरे म्हणाले, लोकलच्या बाबतीत आपण लगेच निर्णय घेत नाही आहोत. पहिल्या टप्प्यात लोकलचा निर्णय घेणं कठिण आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. त्यासाठी केंद्रानेही सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आपल्याला गाफील राहून चालणार नाही. असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल होते.

दरम्यान, राज्य सरकारने कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या 22 जिल्ह्यात मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. तर 11 जिल्ह्यात लेवल 3 चे निर्बंध कायम राहणार आहेत. नव्या नियमानुसार 22 जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत सर्व दुकानं सुरु ठेवता येतील. तर शनिवारी दुपारी 3 पर्यंत दुकानं सुरु ठेवण्यास मुभा असेल. मात्र रविवारी पूर्णत: बंद असेल.

Leave a Comment