राष्ट्रवादीचे खायचे दात अन दाखवायचे दात वेगळे; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून टीकास्त्र डागले जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीवर टीका केल्यानंतर देशपांडे यांनी आज पुन्हा निशाणा हल्लाबोल केला. “राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे अन दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका देशपांडे यांनी केली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “सध्या राष्ट्रवादीकडून चांगले राजकारण केले जात आहे. एकीकडे पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचे. त्याबाजूने बोलायचे आणि दुसरीकडे संकुचित राजकारण करायचे काम राष्ट्रवादीकडून केले जात आहे. हे आमच्यासह पूर्ण महाराष्ट्र गेल्या वीस वर्षांपासून बघत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीने जे केले आहे तेच बोलले आहेत.”

यावेळी देशपांडे यांनी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनाही अप्रत्यक्ष इशारा दिला. जे कोणी आता राज ठाकरे यांच्या भूमिकेवर बोलत आहेत त्यांना एक ना एक दिवस नक्की योग्य उत्तर दिले जाईल, त्यामुळे राज ठाकरेंवर बोलण्याआधी टीका करणाऱ्यांनी विचार करावा, असेही देशपांडे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment