निष्पाप मुलीच्या जीवाशी खेळणारा वनमंत्री वनवासात ; मनसेच्या फायरब्रँड नेत्या शालिनी ठाकरे यांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील वानवडी भागातील हेवन पार्क या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करतं आपले जीवन संपवले होते.या तरुणीचे संबंध हे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी जोडल्याचे आरोप झालेत तसेच राठोड आणि पूजा यांचे काही कथित ऑडिओ रेकॉर्डिंग्ज,फोटोज् देखील समोर आल्या आहेत. यामुळे संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारीचं भान राखत मंत्रिपदाचा राजीनामा अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुफुर्द केला आहे.येत्या अधिवेशनात या प्रकरणावरून प्रचंड डोकेदुखी वाढेल असा मुख्यमंत्र्यांचा अंदाज होता.म्हणून त्यांनी राजीनामा घेतला असल्याचं सध्या बोललं जातंय.

संजय राठोड यांच्या राजीनामा प्रकरणावर मनसेच्या फायर ब्रँड नेत्या शालिनी ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी महाविकास आघाडीवर शरसंधान साधले आहे.

शालिनी ठाकरे म्हणाल्या की ”मंत्री वाचवा, पुरावे जिरवा’ या मोहिमेतून बाहेर पडून अखेर मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांना राजीनामा द्यायला अखेर भाग पाडले. महाविकास आघाडीच्या भ्रष्ट राजवटीतली पहिली शिकार यानिमित्ताने झाली! निष्पाप मुलीच्या जीवाशी खेळ करणारा वनमंत्री अखेर वनवासात गेला, याचा निश्चितच आनंद आहे’, अशा आशयाचे ट्वीट करत शालिनी ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like