राज ठाकरेंच्या दौऱ्याआधी औरंगाबादेत मनसेला गळती; अनेक पदाधिकारी सेनेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 14 डिसेंबर रोजी औरंगाबादसह मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र तत्पूर्वीच औरंगाबादमधील मनसेला गळती लागली. गुरुवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार दानवे यांच्या पुढाकारातून पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

राज ठाकरे यांच्या दौऱ्याआधीच शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये कन्नडचे माजी जि.प. सदस्य शैलेश क्षीरसागर, अविराज निकम, मनसेचे माजी शहराध्यक्ष राजेश थोरात, मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष सतीश फुलारे, शंकर कदम, अक्षय म्हस्के, माजी नगरसेवक कांतीलाल निरपगारे, सामाजिक कार्यकर्त्या शकिला पठाण, बाळासाहेब औताडे, जुनेद अख्तर, मोहंमद साजिक आदींचा समावेश आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमास पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले, मनसे गळकं घर असल्याचे मनसेचे पदाधिकारी स्वगृही परतत आहेत. कारण शिवसेनेचा वाडा गळका नाही. इथे प्रवेश मिळतो, पण बाहेर जाण्यासाठी कोणी दरवाजा उघडत नाही. शिवसेनेचा वाडा चिरेबंदी आहे.

Leave a Comment