‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं! राज ठाकरेंनी ऋषी कपूर यांना वाहिली पत्रातून आदरांजली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । हरहुन्नरी आणि अष्टपैलू अभिनेता इरफान खान याचे निधनाच्या धक्क्यात असतानाच सिनेप्रेमींना आज दुसरा जबर धक्का बसला आहे. सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचे कर्करोगाने आज मुंबईत निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. कालच अभिनेता इरफान खानचे निधन झाले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. ऋषी कपूर हे ट्विटरवर खूप सक्रिय होते. त्यांच्या ट्वीटची नेहमी चर्चा व्हायची. अनेकदा त्यांनी केलेल्या बिनधास्त आणि निडर ट्विटमुळे ते वादाच्या भोवऱ्यात देखील सापडले. मात्र, आपलं निखळ मत ट्विटरवर मांडणं त्यांनी शेवटपर्यंत चालू ठेवलं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील त्यांना आदरांजली अर्पण करताना त्यांच्या ट्वीटबाबत प्रकर्षाने उल्लेख केला आहे. एक ‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं! असं राज ठाकरे यांनी ट्विट करताना एक पत्र शेअर केलं आहे.

राज यांनी शेअर केलेलं हेच ते पत्र..

Image

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

Leave a Comment