मनसेच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पक्षाचा झेंडा गायब, उरलं केवळ इंजिन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी २३ जानेवारीच्या मेळाव्याची जोरदार तयारी केली आहे. बॅनर, पोस्टर, टॅगलाईन आणि प्रोफेशनल इव्हेंटप्रमाणे सगळं दिसून येत आहे. दरम्यान, मनसेच्या अधिकृत फेसबुक पेज आणि ट्विटरवरुनही मनसेचा झेंडा गायब झाला आहे. केवळ इंजिनाचा फोटो या दोन्ही प्रोफाईलवर दिसत आहे. यापूर्वी चार रंगाच्या झेंड्यावर रेल्वे इंजिनचे चिन्ह होते. मात्र, आता फक्त रेल्वे इंजिनच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मनसेच्या झेंडाबदलाचं जवळपास निश्चित झाल्याचं दिसून येतंय. आता, २३ जानेवारीलाच मनसेच्या नवीन झेंड्याच अनावरण होईल, अशी चर्चा सुरू आहे.

त्यानुषंगाने मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून मनसे पदाधिकारी शिरीष सावंत यांच्या वतीनं २३ जानेवारीला सकाळी ९ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्याचे उदघाटन करणार असल्याची माहिती पोस्ट करण्यात आली आहे. या मेळाव्यात मनसे कार्यकर्त्यांना नवी दिशा देण्याचे सुतोवाच पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. राज यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. या झेंड्यातील भगवा रंग नजरेत भरणारा असून महामेळाव्याकरिता लावलेली पोस्टर्स राज यांच्या नव्या महाराष्ट्र धर्माचे संकेत देत आहेत.

 

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

 

साईबाबा जन्मस्थानाचा शोध मुंबईकराने लावला; वाचा स्पेशल रिपोर्ट

जेव्हा मुख्यमंत्री तहसीलदारासाठी खुर्ची सोडतात; वाचा नेमकं काय घडलं..

पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांचा वेळ वाया घालवू नये : कपिल सिब्बल

Amazon घेऊन येत आहे पर्यावरणपूरक ई रिक्षा; संस्थापक जेफ बेझोस यांनी ट्विटरवरून दिली माहिती

Leave a Comment