तुम्ही मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी याचिका करू का आंदोलन? मनसेचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री जनतेला संबोधित करताना विविध विषयांवर भाष्य केले. मुंबई लोकल प्रवासासाठी काही सूट देण्यात आली असून 15 ऑगस्ट पासून 2 डोस घेतलेल्या लोकांना लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्वागत करतानाच मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

“आंदोलन, याचिका, पत्र, विनंती, त्रागा, धमकी, बातमी लावून धरणं आणि इतर अनेक उपाय या माध्यमातून लोकल १५ ऑगस्टला चालू करण्याची आपण घोषणा केली. असो आपलं अभिनंदन, आता आपण मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न येत्या १५ ऑगस्टपासून सोडवाल यासाठी याचिका करू का आंदोलन हे ही सांगा,” असा टोला देशपांडे यांनी लगावला आहे.

दरम्यान कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनेक नियम शिथील करण्यात आले. मात्र, मुंबईची लोकल ट्रेन बंद होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विरोधकांकडून सातत्याने लोकल सुरु करण्याची मागणी होत होती. अखेर २ डोस घेतलेल्याना लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात अली आहे

Leave a Comment