पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे आणि मुख्यमंत्र्यांना BMC पुढे काही दिसत नाही – मनसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही आणि इकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही अशा शब्दांत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य आणि केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी यापूर्वी देखील पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केला होता.

यासंदर्भात संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मोदी आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही, मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला दोघांमध्ये भविष्य दिसत नाही असे संदीप देशपांडे यांनी म्हंटल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांचे स्वत:च्या राज्यावर प्रेमही आहे. पण आमचे मुख्यमंत्री मुंबईत राहूनही घराबाहेर पडत नाहीत, असा टोला देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निदान मुंबईत तरी पाहणी करण्यासाठी बाहेर पडावे, असे देशपांडे यांनी म्हटले होते.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment