२०१२ नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकारांचा झाला का?; मनसेचा खोचक सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या आमदार निधीचा वापर शिवाजीपार्कच्या सुशोभीकरणासाठी करणार आहेत. यावरून संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘चोरी करायची तर स्वखर्चाने तरी करा असं म्हणत २०१२ नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकरांचा झाला आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हंटल की, “२०१२ नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकारांचा झाला आहे का? दुसऱ्यांचे कार्यकर्ते, नेते, नगरसेवक चोरणे, शिवतीर्थावरील जलसंचय प्रकल्प, सेल्फी पॉईंट आणि आता तर राजसाहेबांच्या संकल्पनेतून दरवर्षी साकारला जाणारा विद्युत रोषणाई प्रकल्प. चोरी करायची तर स्वखर्चाने तरी करा ती पण जनतेच्या पैशांनी?

दरम्यान, दरवर्षी दिवाळीत मनसेतर्फे शिवाजी पार्क मैदानाभोवती कंदील व दिव्यांची आकर्षक रोषणाई केली जाते. त्यामुळं राज्य सरकारकडून रोषणाई केली जाणार असल्यानं मनसेच्या रोषणाईचे काय होणार?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मनसेच्या रोषणाईला शिवसेनेने हे उत्तर दिले असल्याची चर्चा आहे.

Leave a Comment