१०० कोटींची वसुली आता ३०० कोटींवर? गृहमंत्री किमान निष्पक्ष चौकशी करणार का?; मनसेचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रादेशिक परिवहन विभागात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणावरुन आता राजकारणही तापलं आहे. याच मुद्द्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकार वर टीका करत या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हंटल की, १०० कोटींची वसुली आता ३०० कोटींवर पोहोचली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विभागाचे अधिकारी पाटील यांनी नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनात तक्रार केली आहे. आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील किमान निष्पक्ष चौकशी करणार का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण –

नाशिकमध्ये नियुक्ती असलेल्या गजेंद्र पाटील या मोटार वाहन निरीक्षकाने आरटीओतील गैरव्यवहार प्रकरणी थेट पंचवटी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. आरटीओमध्ये सध्या बदल्यांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होतात. परिवहन आयुक्तालय हे मुख्य केंद्र असून, संकलित झालेल्या काळ्या पैशांमध्ये थेट परिवहनमंत्र्याचा संबंध असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment