हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल- रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. भर पावसात स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्री पंढरपूरला गेले होते. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत खोचक टोला लगावला आहे.
संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हंटल, ” हे बा विठ्ठला जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे. आणि जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेउदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना. पांडुरंग… पांडुरंग..”
हे बा विठ्ठला जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे. आणि जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेउदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना. पांडुरंग… पांडुरंग..
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 20, 2021
मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत पंढरपूरला गेले-
दरम्यान, राज्यातील खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे पंढरपूरच्या दिशेनं विमानाने जाणं शक्य नसल्यामुळे मुख्यमंत्री रस्तेमार्गानंच पंढरपूरला गेले. यावेळी मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत होते. आज सकाळी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय आषाढी एकादशी महापूजा करण्यात आली.