राज ठाकरेंच्या पत्रानंतर हाफकिन्सला लसीची परवानगी, याला म्हणतात “ठाकरे ब्रँड” – मनसेचा शिवसेनेला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने हाफकिन्स संस्थेला लस उत्पादन करण्याची परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला ठाकरे ब्रँड वरून टोला लगावला आहे. राज ठाकरेंचं पत्र गेल्यावरच हाफकिन्सला परवानगी मिळाली अस म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

“राज्य सरकारने जानेवारीतच हाफकिन्सला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. पण त्याची परवानगी राज ठाकरेंचं पत्र गेल्यावर आली. याला म्हणतात “ठाकरे ब्रँड”. कोरोना काळात “राजकारण” नको म्हणणाऱ्यांनी आभार मानायला हरकत नव्हती.” असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

राज ठाकरेंच केंद्राला पत्र –

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीचा होत असलेला तुटवडा यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं होत. यात त्यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याच्या मागणीसह पाच मागण्या केल्या होत्या. यात लसीचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी केली होती.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment