थेट शिवसेना भवनासमोर भोंगा लावून हनुमान चालीसा; मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मशिदी वरील भोंगे राज्य सरकारने बंद करावे नाहीतर त्या भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावा असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते. त्यानंतर राज्यभर वातावरण तापलं असतानाच आता मनसेचे शिवसेनेला पुन्हा एकदा डीवचत थेट शिवसेना भवनासमोरच हनुमान चालीसा लावली. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे शिवसेना आणि मनसेत पुन्हा एकदा राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.

आज सकाळी मनसेने शिवसेना भवनासमोर एका रथात भोंगा लावून हनुमान चालिसा लावला होता, शिवसेनेला डिवचण्यासाठी मनसेचा हा प्रयत्न आहे, त्यावर पोलिसांनी कारवाई करत मनसेनं लावलेले भोंगे पोलिसांनी जप्त केले आहेत. तसेच मनसे नेते यशवंत किल्लेदार यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यानंतर किल्लेदार यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेनं सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं असा आरोप त्यांनी यावेळी केला.

किल्लेदार म्हणाले, आज रामनवमीचा सण आहे. राज ठाकरेंनी जसं सांगितलंय, की सगळे सण उत्साहात साजरे व्हायला हवेत. विविध ठिकाणी आमच्या विभागात राम नवमीचा उत्सव साजरा होत आहे. त्यांना प्रेरणा देण्यासाठी आम्ही हा रथ तयार केला आहे. ज्या ज्या उत्सव मंडळांकडून किंवा मंदिरांकडून आमच्याकडे रथासाठी मागणी होईल, तिथे आम्ही हा रथ पाठवू. तिथे हनुमान चालिसाचं पठण होईल”, असं किल्लेदार म्हणाले.

Leave a Comment