मनसेच एकमेव मत कोणाला?? राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील एकूण राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी ठाकरे सरकारला उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. अशा वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधातील विश्वासदर्शक ठरावात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचे मत भाजपला देण्याचा विचार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे.

काही वेळापूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना फोन करून राजू पाटील यांचे मत देण्याची विनंती केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी हा निर्णय घेत राजू पाटील यांचे मत भाजपला दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा पाय आणखी खोलात गेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसे मध्ये जवळीक झाल्याचे पाहायला मिळत होते. राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या भोंग्याच्या प्रश्नावर भाजपने पाठिंबा दिला होता. राज्यसभा निवडणूक आणि विधानपरिषद निवडणुकीत देखील मनसेने आपलं मत भाजप उमेदवाराला दिले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे.

Leave a Comment