शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून उद्या मनसेचे ‘धरणे’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमूळे हतबल बळीराजाला तात्काळ मदत जाहीर करण्यात यावी, या मागणीसाठी मनसेच्या वतीने मंगळवारी (दि.12) विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मनसे नेते दिलीप धोत्रे व सरचिटणीस संदीप नागरगोजे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

राज्य सरकारने पंचनाम्यांचा फार्स न करता तात्काळ हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर करावी तसेच प्रत्येक गुरामागे देखील 50 हजरांची मदत जाहीर करावी. तसेच ज्या शेतकरी बांधवांचे घरे उध्वस्त झाली असतील त्यांना देखील आर्थिक मदत यावी या मागण्यांसाठी उद्या धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर घर कोंबड्या व झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी ‘जागरण गोंधळ’ देखील करणार असल्याची माहिती धोत्रे यांनी दिली.

सरकारमधील नेते केवळ बांधांवर जाऊन हातात पीक घेऊन फोटोशेसन करत आहेत. नुकसान झाले हे जगजाहीर आहे, विविध माध्यमातून हे नुकसान डोळ्यांना दिसत आहे. आम्ही तिथे गेलो फोटो काढला आणि झाले ? मदतीचा काय ? असा संतप्त सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मनसेकडून 10 हजारांची मदत

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मनसेच्या वतीने फुल न फुलाची पाकळी या उक्तीप्रमाणे 10 हजारांची मदत देऊ केली असल्याचे देखील धोत्रे यांनी सांगितले. आम्ही देखील बांधांवर केले, शेतकरी कुटुंबियांचे सांत्वन केले मात्र फोटोसेशन केले नाही.

Leave a Comment