हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यात मनसे अॅमेझॉन विरोधात आक्रमक झाली आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन पुण्यातील कोंढाव्यातील अॅमेझॉनचं ऑफिस मनसेने फोडलं आहे. पुण्यातील कोंढवा मनसे प्रभाग अध्यक्ष अमित जगताप यांच्या नेतृत्वात अॅमेझॉनच्या कार्यालयावर खळखट्याक आंदोलन केलं आहे.अॅमेझॉनच्या वेबसाईटवर मराठील भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. मराठी भाषेचा पर्याय असेल तर मराठी लोकांना बेवसाइटवरून आवश्यक वस्तूंची योग्य निवड करणं सोप्प होईल. मात्र यावर अॅमेझॉनकडून अपेक्षित असं उत्तर आलं नाही.
अॅमेझॉननं मनसेच्या मागणीला सकारत्मक प्रतिसाद दिला नसल्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी अॅमेझॉन विरोधात ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ मोहीम सुरु केली होती. मनसेचे पुण्यातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी पुण्यातील कोंढवा मनसे प्रभाग अध्यक्ष अमित जगताप यांच्या नेतृत्वात अॅमेझॉनच्या कार्यालयावर खळखट्याक आंदोलन केले आहे.
मनसे-अॅमेझॉनमध्ये नक्की काय वाद आहे ?
अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केलेल्या मोहिमे अंतर्गत अॅमेझॉनविरोधात (Amazon) फलक लावण्यात आले आहेत. यावर ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ असा मजकूर लिहण्यात आला आहे. वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर मनसेचे हे फलक पाहायला मिळत आहेत. मनसेचे नेते अखिल चित्रे यांच्याकडून हे फलक लावण्यात आले होते. यापूर्वी मनसेकडून अॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर पोस्टर झळकावण्यात इशारा देण्यात आला होता. तुम्हाला महाराष्ट्रात आमची भाषा मान्य नाही. मग आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही मान्य नाही, अशी तंबी मनसेने दिली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’