नवी दिल्ली । आपण मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी, पाणी आणि विज बिल भरण्यासाठी, बुक गॅस सिलेंडर किंवा ऑनलाइन ऑर्डरसाठी मोबिक्विक वॉलेट (MobiKwik Wallet) वापरत असाल. तर आता देशातील सर्वात मोठे डिजिटल वॉलेटपैकी एक असलेल्या मोबिक्विक यांनी कंझ्युमर फायनान्स प्रोव्हायडर होम क्रेडिट इंडिया (Home Credit India) च्या सहकार्याने ‘होम क्रेडिट मनी’ (Home Credit Money) बाजारात आणला आहे.
आता तुम्हाला मिळेल 10 हजार रुपयांपर्यंतचे इंटरेस्ट फ्री लोन
होम क्रेडिट मनीअंतर्गत, मोबीक्विक यूजर्सना 10 हजार रुपयांपर्यंतचे इंटरेस्ट फ्री लोन (Interest-Free Loan) ऑफर करत आहे. मोबिक्विकचा असा दावा आहे की, त्यांच्या अॅपद्वारे ग्राहकांना इन्स्टंट लोन मिळेल.
2,40,000 रुपयांपर्यंतच्या पर्सनल लोनचे देखील फायदे
होम क्रेडिट गट युरोप आणि आशियामधील 9 देशांमध्ये पसरलेला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की,’ होम क्रेडिट मनी यूजर्सना 1,500 ते 10 हजार रुपयांपर्यंत इन्स्टंट इंटरेस्ट फ्री लोन घेण्यासाठी ऑफर केली जात आहे, जे थेट त्यांच्या होम क्रेडिट मनी वॉलेटमध्ये येतील. याशिवाय ग्राहक 2,40,000 रुपयांपर्यंतचे पर्सनल लोनही घेऊ शकतात. तथापि, यावर व्याज द्यावे लागेल. आपण ईएमआयद्वारे ही रक्कम परत करू शकता.
2,40,000 रुपये कर्ज घेण्यासाठी आपल्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. यासह, आपल्याकडे मोबिक्विक खात्याचे केवायसी असणे देखील महत्वाचे आहे. याशिवाय आपण कर्जासाठी अर्ज करू शकणार नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.