Tuesday, March 21, 2023

खुशखबर ! तुमचा हारवलेला मोबाईल फोन मोदी सरकार शोधून देणार

- Advertisement -

मुंबई प्रतिनिधी | मोबाईल चोरीला गेल्याने होणार मनस्ताप तुम्ही सोसला असेल मात्र आता तो मनस्ताप तुम्हाला आता भोगावा लागणार नाही. कारण मोदी सरकारने लोकउपयोगी निर्णय घेतला आहे. तुमचा चोरीला गेलेला मोबाईल आता केंद्रीय दूरसंचार विभाग शोधून देणार आहे. या योजनेचा शुभारंभ आज मुंबई येथे रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आला.

केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागा मार्फत देशभरात चोरीला गेलेले मोबाईल शोधून देण्याचे काम केले जाणार आहे. मोबाईलचा IMEI नंबर तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. त्या आधारावरच तुमच्या मोबाईलचा शोध घेतला जाणार आहे. IMEI नंबरच्या आधारे तुमच्या चोरीला गेलेल्या मोबाईलला ट्रॅकर लावला जाणार आहे. त्या ट्रॅकरच्या माध्यमातून तुमचा मोबाईल शोधला जाईल. तसेच तुमच्या मोबाईल मध्ये कोणत्याही कंपनीचे सिम टाकल्यास त्याचा दूरसंचार विभागाला मॅसेज जाईल त्यामुळे तुमचा मोबाईल शोधणे सोपे जाईल.

- Advertisement -

चोरीला गेलेला मोबाईल मिळण्यासाठी या कृती करा

मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल करा. पोलिसांनी FIR नोंदवल्याची पावती तुम्ही मागून घ्या. त्यानंतर दूरसंचार विभागाच्या १४४२२ या क्रमांकावर संपर्क साधून यासंदर्भात माहिती द्या. त्यानंतर पुढील कारवाही दूरसंचार विभाग करेल आणि तुमचा मोबाईल तुम्ही तक्रार दाखल केलेल्या पोलीस स्टेशनला पोच करेल. त्यानंतर तुमच्याशी संपर्क साधून तुमचा मोबाईल तुमच्या ताब्यात दिला जाईल.