टेलिकॉम कंपन्यांचा मनस्ताप! “टॉकटाइम फुल,पण नेटवर्क गुल, मग डोकं कसं राहील कूल!”

हॅलो महाराष्ट्र । अनवर शेख

सिम कार्ड धारकांना लाईफ टाईम इन्कमिंग कॉलिंग फ्री चे गाजर दाखवत स्वतःचे साम्राज्य उभे करणार्‍या एअरटेल, जिओ, आयडिया, वोडाफोन कंपन्यांची सध्या मोठी लूट बघायला मिळत आहे. महिन्याकाठी 249 रुपयाचे रिचार्ज करूनही नेटवर्क प्रॉब्लेम मुळे सर्वांनाच मनस्ताप सोसावा लागत आहे.

“कनेक्टिंग इंडिया” “जिओ धन- धना- धन” ची जाहिरात करणाऱ्या कंपन्या मालामाल व सर्वसामान्य जनता नेटवर्कने समस्येने त्रस्त झाल्याचे दिसत आहे. निव्वळ खोटे सांगत लाईफ टाईम ची घोषणा देण्याऱ्या कंपन्यांनी पुढे यू टर्न घेत मोठा फ्रॉड केलेला आहे. याबद्दल सरकार त्यांना जाब विचारेल का? गुगलपे, पेटीएम, फोनपेवर व्यवसाय करणाऱ्या लोकांनी काय करावे याबाबत कळायला मार्ग नाही.

केंद्र सरकारने याकडे लक्ष दिले नाही तर, येणाऱ्या काळात मोबाइल वापरणा-यांची संख्या घटली तर आश्चर्य वाटू नये. नाहीतरी सुपारी देऊन सिम कंपन्या आवळा काढताच राहातील. यात शंका नाही. लोकांना फक्त हेच म्हणावे लागेल टॉकटाईम फुल अन नेटवर्क गुल, मग सांगा डोकं कस राहील कुल?

You might also like