देशी Mobile OS -BharOS देणार Android ला टक्कर; पहा 5 फीचर्स जे तुम्हांला करतील चकित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताला “आत्मनिर्भर” बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनला चालना देण्यासाठी IIT मद्रास इनक्यूबेटेड फर्मने JandK Operations Pvt Ltd च्या मदतीने मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम विकसित केली आहे. डेव्हलपर्स यांनी याला भारोस (bharOs) अस नाव दिले आहे. OS मुळे देशातील 100 कोटी मोबाइल मोबाईल युजर्सना त्याचा फायदा होऊ शकतो.

हे सॉफ्टवेअर व्यावसायिक ऑफ-द-शेल्फ हँडसेटवर install केले जाऊ शकते. डेव्हलपर्स चा दावा आहे की युजर्सना अधिक सुरक्षित अनुभव देण्यासाठी ओएसची रचना करण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला भारताच्या या देसी ऑपरेटिंग सिस्टमबद्दल अशा 5 गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.

1) BharOS ही एक मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम आहे, त्याबाबत डेव्हलपर्स सांगतात की हे युजर्सना अधिक स्वातंत्र्य, कंट्रोल आणि फ्लेक्सिबिलिटी प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करते जे फक्त त्यांच्या आवश्यकत्यानुसार, अँपची निवड आणि वापर करतात.

2) ही इनोव्हेंटिव्ह सिस्टीम युजर्सना त्यांच्या मोबाइल डिव्हाइसवर सुरक्षितता आणि गोपनीयतेबद्दल विचार करण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणण्याचे वचन देते.

3) या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमची चांगली गोष्ट म्हणजे ती नो डिफॉल्ट अॅप्स (NDA) सह येते. याचा अर्थ युजर्सना Android पेक्षा जास्त स्टोरेज स्पेस मिळेल. OEM डीफॉल्ट Google अॅप्स तसेच काही मूळ अॅप्ससह फोन पाठवतात. BharOS सह, एखाद्याला माहीत नसलेलं किंवा विश्वास नसलेले अॅप्स वापरण्याची सक्ती केली जाणार नाही.

4) यामध्ये अँड्रॉइड फोन्सप्रमाणेच ‘नेटिव्ह ओव्हर द एअर’चे (NOTA) अपडेट्स सुद्धा मिळू शकतील. डेव्हलपर्स चा दावा आहे की NOTA अपडेट ऑटोमॅटिकली मोबाईल डिव्हाइसवर डाउनलोड आणि install केली जातात, त्यामुळे युजर्सना मॅन्युअल रूपात प्रक्रिया सुरू करण्याची आवश्यकता नाही.

5) याव्यतिरिक्त, OS ऑर्गनायझेशन स्पेसिफिक प्रायव्हेट अॅप स्टोअर सर्व्हिसेस (PASS) कडील विश्वसनीय अॅप्समध्ये प्रवेश देखील प्रदान करेल. डेव्हलपर्स नी सांगितले की PASS त्या अ‍ॅप्सच्या क्युरेट केलेल्या सूचीमध्ये प्रवेश प्रदान करते ज्या अँपची संपूर्ण टेस्टिंग केली आहे आणि ज्यांनी संस्थेच्या विशिष्ट सुरक्षा आणि गोपनीयता मानकांची पूर्तता केली आहे. याचा अर्थ युजर्सना खात्री असू शकते की ते install केलेले अॅप्स सुरक्षित आहेत.

BharOS सध्या केवळ गोपनीयता आणि सुरक्षिततेसाठी कठोर आवश्यकता असलेल्या संस्थांना आणि ज्यांचे युजर्स संवेदनशील माहिती हाताळतात अशांना प्रदान केले जात आहे.

नवीन मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम चांगली दिसत असली तरी, युजर्सना त्यांच्या दैनंदिन जीवनात डिव्हाइस वापरणे सोपे करण्यासाठी कोणती वैशिष्ट्ये ऑफर केली जातील याबद्दल कोणतेही डिटेल्स नाहीत. उदाहरणार्थ, Android पर्सनलाइजेशन पर्याय, गोपनीयता वैशिष्ट्ये, बॅटरी विश्लेषण, होम स्क्रीन विजेट्स, नोटिफिकेशन सेटिंग्ज आणि बरेच काही ऑफर करते. जेव्हा ते सर्वांसाठी उपलब्ध असेल तेव्हा आम्हाला याबद्दल अधिक स्पष्टता मिळेल अस डेव्हलपर्स नी स्पष्ट केले आहे.