मलकापूर येथे पोलिसांकडून मोबाईल दुकान सील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहर पोलीसांनी दिवसभरात विना मास्क असणाऱ्यांच्या कारवाई केली आहे. तर मलकापूर येथे संचारबंदी आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या एका मोबाईल दुकान सील करण्याची कारवाई केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  पोलिसांनी गुरूवारी दिवसभरात 22 हजार रूपयांचा दंड वसूल केला असून दहा गाड्या जप्त केल्या आहेत.

गुरूवारी सकाळपासून पोलिसांनी संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील चाैका- चाैकात बंदोबस्त वाढवलेला होता. तसेच शहरात येणाऱ्या गाडीची तपासणी करण्यात येत होती. या दरम्यान मास्कचा वापर न करणाऱ्या लोकांच्यार कारवाई करण्यात आली आहे.

मलकापूर शहरात मोबाईल दुकान चालू ठेवण्यास बंदी असतानाही एकाने दुकान सुरू ठेवल्याची माहीती पोलिसांना मिळाली. पोलिस व पालिका मुख्याधिकारी यांनी सदरील दुकानांवर कारवाई केली. तर दुचाकी दहा गाड्यावरही कारवाई करून जप्त करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी माहिती दिली.

You might also like