Mobile Under 10000 : अवघ्या 10 हजारांपेक्षा कमी पैशात खरेदी करा ‘हे’ Mobile; Amazon वर सेल सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध इ कॉमर्स कंपनी Amazon ने Great Summer Sale सुरु केला आहे. या सेलमध्ये फ्रीझ, AC, मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तुंवर बम्पर सूट देण्यात येत आहे. आजकाल मोबाईल खरेदीचे प्रमाण वाढलं आहे. परंतु कमी पैशात उपलब्ध असणारा आणि जास्तीत जास्त फीचर्सने सुसज्ज असे मोबाईल खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. सर्वसामान्य ग्राहक तर १० ते १५ हजार रुपयांत मोबाईल विकत घेण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही सुद्धा Amazon च्या सेलमधून स्वस्तात मस्त मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही मोबाईल बाबत सांगणार आहोत जे तुम्ही १० हजार रुपयांच्या (Mobile Under 10000) आतच घरी घेऊन जाऊ शकता. चाल तर मग जाणून घेऊयात…

Nokia G42 5G

Nokia G42 5G चा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,499 रुपये आहे. तुम्ही ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे मोबाईल खरेदी केल्यावर 10% इन्स्टंट डिस्काउंट (1,000 पर्यंत) मिळू शकते, त्यानंतर मोबाईलची किंमत 8,549 रुपये असेल. Nokia G42 5G मध्ये 90 Hz रिफ्रेश रेट 6.56-इंचाचा डिस्प्ले देण्यात आलाय. हा डिस्प्ले 720×1612 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. स्मार्टफोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480+ प्रोसेसर देण्यात आला असून हा मोबाईल मूनलाईट ग्रे कलर ऑप्शनसह लाँच करण्यात आलाय.

Redmi 13C 5G- Mobile Under 10000

Redmi 13C 5G च्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,499 रुपये आहे. मात्र Amazon सेल दरम्यान, कूपन ऑफरद्वारे 1,000 रुपयांची सूट तुम्हाला मिळू शकते, म्हणजेच 9,499 रुपयांत तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. Redmi 13C 5G स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.74 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 6100+ चिपसेट बसवली असून हा स्मार्टफोन Android 13 आधारित MIUI 14 वर काम करतो. Redmi चा हा मोबाईल 50MP चा मुख्य कॅमेरा आणि समोरील बाजूला 5MP च्या फ्रंट कॅमेराने सुसज्ज आहे. पॉवरसाठी 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

POCO M6 5G

POCO M6 5G च्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 9,249 रुपये आहे. मात्र ऍमेझॉन सेलमध्ये ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे मोबाईल खरेदी केल्यास तुम्हाला 1,000 रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच अवघ्या 8,324 रुपयांत हा मोबाईल तुम्ही खरेदी (Mobile Under 10000) करू शकाल. Poco M6 5G स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.74 इंचाचा डिस्प्ले देण्यात आलाय. मोबाईल यामध्ये MediaTek Dimensity 6100+ चिपसेट बसवण्यात आली असून पोकोचा हा मोबाईल Android 13 आधारित MIUI 14 वर काम करतो. मोबाईल मध्ये 50MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून 5MP चा AI सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. मोबाईल मध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.